Friday, July 17, 2020

शिक्षकांचा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पध्दतीने बदल्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा ; बदल्यासाठी वशिल्याच्या जाचातून शिक्षकांची मुक्तता करा - पंकजा मुंडे

शिक्षकांचा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पध्दतीने बदल्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा ; बदल्यासाठी वशिल्याच्या जाचातून शिक्षकांची मुक्तता करा - पंकजा मुंडे



परभणी / सोनपेठ (दर्शन):-

शिक्षकांचा ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन पध्दतीने बदल्याचा निर्णय पूर्णतः चुकीचा आहे. ऑनलाईन प्रणालीतच काही बदल अपेक्षीत असल्यास ते करावेत, परंतू शिक्षकांच्या ऑनलाईन पध्दतीनेच बदल्या कराव्यात. शिक्षणाचे पवित्र काम करणा-या शिक्षकांना बदल्यासाठी वशिल्याच्या जाचातून मुक्त करावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.जिल्हा परिषदेतंर्गत शिक्षकांच्या जिल्हातंर्गत व आंतरजिल्हा बदल्या मानवी हस्तक्षेपा शिवाय संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन करण्यात आल्या होत्या.सदरच्या बदल्यांचे धोरण राबवितांना सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा करूनच सर्व समावेश असे धोरण ठरविल्या गेले होते. त्या अनुषंगानेच 2018-19 या वर्षात राज्यभरात सुमारे 98 हजार शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या मानवी हस्तक्षेपा शिवाय संगणीय प्रणालीद्वारे करण्यात आल्या,असे मुंडे यांनी या निवेदनातून नमुद केले आहे. सदर बदल्याच्या धोरणास उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केले होते.तसेच सदरच्या प्रणालीस केंद्रीय स्कॉच अवार्डने देखील सन्मानीत करण्यात आले होते,असेही मुंडे यांनी या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले.राज्य प्राथमिक शिक्षक संघाने तसेच राज्य शिक्षक परिषदेने या अनुषंगाने ऑनलाईन पध्दतीने बदल्यानाच पसंती दिली आहे. कोरोना सारख्या आपत्तीत जिल्हा परिषद शाळां बंद आहेत.आपण ऑनलाईन पध्दतीने उपक्रम राबवित आहात.वर्कहोम संकल्पनेला साकारत आहोत.असे असतांना शिक्षकांच्या ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन बदल्याचा निर्णय आश्‍चर्य कारक आहे. या निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे, असे मुंडे यांनी शेवटी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment