Wednesday, July 22, 2020

भाजप युवा मोर्चाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना हजारो पत्राद्वारे जय श्रीराम ....

भाजप युवा मोर्चाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांना हजारो पत्राद्वारे जय श्रीराम ....


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिर निर्माणा करीता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.5 ऑगस्ट 2020 रोजी भूमीपूजन सोहळा पार पडणार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडुन केल्या गेलेल्या आक्षेपहार्य विधानाचा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार
 यांचे मंदिर बांधुन कोरोना जाणार नाही या आशयाचेे विधान करोडो श्रीराम भक्त तसेच हिंदुच्या भावनांना ठेस पोहचली आहे, असे नमुद केले. 
या विधानाचा निषेध म्हणुन भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, प्रदेश प्रभारी संजय कौडगे यांच्या निर्देशानुसार बुधवारी  राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार 
यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या बंगल्यावर भाजपा युवा मोर्चा परभणी महानगर द्वारे शहरामधील पोस्ट ऑफिस समोर एकत्ररित्या जय श्रीराम अशा आशयाचे पत्र पाठविण्यात आले. 
युवा मोर्चा कडुन येणार्‍या दोन तीन दिवसामध्ये संपूर्ण परभणी जिल्ह्यातून 20 हजार पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्या बंगल्यावर पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, युवा मोर्चा चे प्रदेश सचिव प्रदीप तांदळे, दिनेश नरवाडकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामदास पवार, रोहित जगदाळे, अनंता गिरी, विठ्ठल बेनशेटीवार, संदीप कुलकर्णी, नीरज बुचाले, गजानन रापतवार, दीपक भराड, निखिल काळे, अमोल जाधव आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


  
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.



No comments:

Post a Comment