आईच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त केले वृक्षारोपण
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील परिवर्तनवादी जोडपे तसेच प्रती फुले दाम्पत्य म्हणून ओळख असणारे शिवश्री.बालासाहेब इंगोले व त्यांच्या पत्नी जिजाऊ ब्रिगेड परभणीच्या माजी जिल्हाध्यक्षा शिवमती पुष्पाताई इंगोले यांनी दि.5 जुलै 2020 रवीवार रोजी आंब्याच्या रोपाचे वृक्षारोपण केले.निमित्त होते बालासाहेब इंगोले यांच्या मातोश्री स्व.गंगाबाई लिंबाजी इंगोले यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे.एरवी समाजात या कार्यक्रमा निमित्त बराच व्यर्थ खर्च केला जातो.मात्र इंगोले परिवाराने ही छोटिशी मात्र अनुकरणीय कृती करून समाजासमोर आदर्श ठेवला आहे.इंगोले परीवाराचे सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.



No comments:
Post a Comment