Sunday, July 19, 2020

सोमवार पासून संचारबंदी शिथील ; परंतु सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम

सोमवार पासून संचारबंदी शिथील ; परंतु 
सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम 


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसेदिवस वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील संचारबंदी प्रतिबंधीत क्षेत्र वगळून शिथिल केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व आस्थापना व अत्यावश्यक बाबींना मुभा बहाल करण्यात आली असून सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.
नागरी क्षेत्रात दि.10 ते 12 जुलै या दरम्यान जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली होती. परंतू त्या संचारबंदीस दि.12 जुलै ते 15 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली होती. ते करते वेळी नागरी क्षेत्रा ऐवजी गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यातच संचारबंदीचा निर्णय घेतला होता. गंगाखेड शहरासह तालुक्या संदर्भात स्वतंत्र आदेश बजावून दि.19 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली होती. पुन्हा 15 ते 17 जुलैपर्यंत दोन दिवस संचारबंदी वाढवली.त्यात दोन दिवसांची वाढ म्हणजेच 17 ते 19 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली.

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील संचारबंदीस शिथिलता बहाल केली आहे.त्यामुळे यापुर्वी जिल्हा प्रशासनाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजे पर्यंतचं अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्तही मुभा बहाल केलेल्या अस्थापना व दुकानांच्या व्यवहाराचा मार्ग मोकळा झाला आहे.परंतु 
सायंकाळी 5 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे.


  
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.


No comments:

Post a Comment