माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन यांच्या वतीने आर्थिक मदतीची मागणी
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन च्या सर्व सदस्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माननीय तहसीलदार सोनपेठ यांच्या मार्फत एका निवेदना द्वारे सर्व च्या सर्व फोटो स्टुडिओ दुकानदारांनी निवेदनात आमची संपूर्ण लग्नसराई या "कोरोना" महामारी च्या लाँकडाउन मध्ये वाया गेली अख्या वर्षभराची सर भरून निघणार नाही ? सीजन गेले म्हणून दुकान किराया, दुकान खर्च, घर खर्च, लाईट बिल व नोकरांचे पगार आधी थांबले नाही म्हणून संपूर्ण सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन सर्व दुकानदार आर्थिक विवंचनेत सापडलो आहोत म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या अर्जाचा विचार करून आमच्या बँक खात्यामध्ये आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे अशी विनती केली आहे. या आर्जा सोबतच सर्व दुकानदारांनी दुकानाचा परवाना, बँकेचे पासबुक, रेशन कार्ड व आधार कार्ड आदी सह सोनपेठ फोटो स्टुडिओ असोसिएशन अध्यक्ष व सचिव यांचे पत्र जोडलेली आहेत हे निवेदन घेऊन माननीय तहसीलदार सोनपेठ यांना अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, सचिव प्रमोद मोडीवाले, सदस्य दत्तराव सोळंके व बालाजी हाके यांनी मास्क वापरत, सिनेटायझर होऊन शोषल डिस्टन्सिंग पाळत सपुर्थ केले.



No comments:
Post a Comment