कोरोनाबाधित रुग्णावर यशस्वी डायलेसीस
परभणी / सोनपेठ (दर्शन):-
परभणी तालुक्यातील शहापूर येथील कोरोनाबाधित एका 35 वर्षीय रुग्णावर परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयात रविवारी (दि.12) डायलेसीस विभागाच्या वैद्यकीय अधिका-यांसह पथकाने यशस्वीरित्या डायलेसीस केले.
शहापूर येथील हा रुग्ण यापुर्वीपासून पुण्यात डायलेसीसचे उपचार घेत होता. तेथून तो परभणीत परतला. तेव्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात त्या रुग्णाचा उपचारापुर्वी स्वॅब घेण्यात आला. तो कोवीड पॉझिटीव्ह निघाला. पाठोपाठ उपचारा दरम्यान त्यास डायलेसीसची आवश्यकता असल्याचे नक्की झाले. संबंधीत रुग्णाच्या आवश्यकत्या इतर सर्व चाचण्या पुर्ण करीत जिल्हा रुग्णालयातील डायलेसीस विभागाचे प्रमुख डॉ.बी.एस.नरवडे, डॉ.दुर्गादास पांडे, डॉ.सुधाकर कोल्हे व युनिटच्या परिसेविका हेमा पाटोळे आदी कर्मचा-यांनी या रुग्णावर यशस्वीरित्या डायलेसीस केले. त्या रुग्णाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सुरवसे यांनी दिली.दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रकाश डाके यांच्या नेतृत्वाखाली हे उपचार करण्यात आले.


No comments:
Post a Comment