जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून
कोव्हिड-19 बाबत जनजागृती कार्यक्रम
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत परभणी येथील शासकीय मुलांच्या बालगृहात कोव्हिड-19 च्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी व जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन दि.22 जुलै रोजी दुपारी 4.30 वाजता करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ.के.शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शासकीय मुलांच्या बालगृहाच्या परिविक्षा अधिकारी श्रीमती अर्चना मन्नतकर यांनी केले तर आभार अधिक्षक गोविंद अंधारे यांनी मानले.असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,परभणी यांनी कळविले आहे.



No comments:
Post a Comment