दहावी बोर्ड परीक्षेत व्हिजन पब्लिक स्कूल चे घवघवीत यश ; सर्वप्रथम सुमित रविकुमार स्वामी 96.00%
विश्वभारती जनसेवा प्रतिष्ठान परभणी संचलित व्हिजन पब्लिक स्कूल सोनपेठ 2020 बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल 100% एवढा लागला आहे.विद्यालयातून एकूण 33 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते.यापैकी 33 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.5 विद्यार्थ्यांना 90% पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.तर 20विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. 11 विद्यार्थी प्रथम श्रेणी सह उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातून सर्वप्रथम सुमित रविकुमार स्वामी 96.00% , सर्वद्वितीय कु.निकीता मधुकर स्वामी 93.20% , तृतीय पुजा झाड 92.20% तर चतुर्थ कदम शुभांगी 91.40% गुण घेऊन गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष मा.पवार साहेब तसेच संस्थेच्या सचिव मा.सौ.सारिका पवार संस्थेचे संचालक मा.विनोद पवार गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण साहेब प्राचार्य डॉ पांडुरंग दुकळे ,उपमुख्याध्यापक भगवान घाटुळ, रामेश्वर हुंबे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.




No comments:
Post a Comment