रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप; संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
शहापूर येथील पस्तीस वर्षीय रामदास केरबाजी आदोडे यांंचा जिल्हा रुग्णालयात दिनांक 20 जुलै रोजी रात्री मृत्यू झाला असून हा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतनिे करण्यात आला आहे. याबाबत दि.21 जुलैं रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष बालाजी मोहिते, महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, उपाध्यक्ष अशोक बोकन, सुरज लहाने, गोविंद देशमुख, शाम गोखणे, किशोर गोखणे, प्रकाश आदोडे, सुभाष बेलवाडे, भास्करराव मोरे आदींच्या सह्या आहेत.
सदर रुग्णाला कोरोनाची लागण झालेली नसताना पॉझिटिव्ह दाखवून वेळेवर डायलिसीस न केल्यामुळे सिव्हील सर्जन व डॉक़्टरांच्या हलजर्गीपणामुळे सदरील रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
मयताच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत. शासनाकडून मयताच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी व चौंकशी करुन सिव्हील सर्जन व इतर दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment