Wednesday, July 8, 2020

जिल्हा परिषद परभणी मार्फत दिव्यांग बांधवांना होणार अन्न व खाद्यपदार्थ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

जिल्हा परिषद परभणी मार्फत दिव्यांग बांधवांना होणार अन्न व खाद्यपदार्थ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा



सोनपेठ (दर्शन) :-
 
परभणी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती. निर्मलाताई उत्तमराव गवळी व मुख्य कार्यकारी अधिकारी बि.पि.पृथ्वीराज यांचे नावीन्यपूर्ण संकल्पनेतून सन 2020-21 या वर्षात दिव्यांग व्यक्तींना अन्न व खाद्यपदार्थ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची योजना जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणार आहे. या करिता दिव्यांग व्यक्तींना अन्न व खाद्यपदार्थ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे या योजनेचे प्रस्ताव दिनांक 20 जुलै 2020 पर्यंत जिल्हा परिषदेला सादर करण्यात यावे असे आवाहन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले आहे. सदर योजनेचा दिव्यांग व्यक्तींना लाभ घेने करिता विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.सदर अर्जा मध्ये संबंधित दिव्यांग व्यक्तीचे नाव, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, त्याचे बँकेचे पासबुक व आधार कार्ड आणि संपर्क क्रमांकाचा तपशील इत्यादी अतिशय मोजकी माहिती अर्जामध्ये भरून द्यायचे असून, सोबतच लाभार्थ्यांना हमीपत्र भरून देणे आहे. सदर हमीपत्र हे लाभार्थी त्याच्या आवश्यक ते नुसार स्वनिधीतून साहित्य खरेदी करून स्वतःसाठी वापरणार आहेत. याबाबतचे असून त्याकरिता त्याला सदर हमीपत्र आणि अर्ज  हे पंचायत समिती ला आवश्यक कागदपत्रे जोडून सादर करावयाची आहे .अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे १) दिव्यांगत्व दिसेल असा पासपोर्ट साईजचा फोटो. २) जिल्हा शल्य चिकित्सक परभणी यांनी दिलेले वैद्यकीय मंडळाचे चे प्रमाणपत्र ची ऑनलाईन प्रत.३) सन 2019 20 या वर्षातील एक लाख रुपये पर्यंतचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. ४)आधार कार्डची छायांकित प्रत आणि. ५)राष्ट्रीयीकृत बँकेतील पासबुकची छायांकित प्रत.
 करिता सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना मिळावा याकरिता माननीय सभापती श्रिमती मिराताई जाधव आणि गट विकास अधिकारी सचिन खुडे पंचायत समिती सोनपेठ यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की विहीत नमुन्यातील अर्ज कागदपत्र सोबत लाभार्थ्यांनी हमीपत्र भरून दिनांक 20 जुलै 2020 पर्यंत पंचायत समिती येथे सादर करावेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




No comments:

Post a Comment