जप्त केलेले वाळूसाठे घरकुल बांधकामासाठी देणार ; जिल्हाधिकारी मुगळीकर यांचे आदेश, प्रहार जनशक्तीच्या मागणीला यश
परभणी,दि.2(प्रतिनिधी)-
वाळू अभावी नागरी व ग्रामीण भागातील घरकुलांची बांधकामे बंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व तहसील कार्यालयाने जप्त केलेले अवैधवाळू साठे घरकुल बांधकामासाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे यांनी 26 जून रोजी जिल्हा प्रशासनाकडे घरकुलबांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. प्रशासनाने जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्यातील वाळू या बांधकामासाठी देण्याच्या पक्षाच्या मागणीनंतर श्री मुगळीकर यांनी विविध शासकीय योजनेतंर्गत मजुर करण्यात आलेल्या घरकुल योजनेसाठी वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी गुरूवारी(दि.दोन) जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पत्र दिले असून त्यात तहसील प्रशासनाने जप्त केलेली वाळू प्राधान्याने घरकुल बांधकामासाठी द्यावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे अंत्यत महागडी झालेली वाळू कमी दरात घरकुल बांधकामासाठी उपलब्ध होवून घरकुलाची कामे मार्गी लागण्या बरोबर मजुरांनाही काम उपलब्ध होणार आहे. या निर्णयाबद्दल प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुथ शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, बालाजी मगर, अंकुश गिरी आदीनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment