सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील महावितरण वीज ग्राहकांना लाँकडाउन च्या काळात आलेली वीज देयके निवारण शंका व समस्या याचे निराकरण करण्यासाठी तसेच माहे जून 2020 वाढिव आलेल्या वीज देयकांच्या संदर्भात नुकताच वेबिनार ऑनलाईन (मीटिंग) संपन्न झाली. या मीटिंग ची सुरुवात माननीय कार्यकारी अभियंता जमदाडे विभागीय कार्यालय दोन परभणी व उपकार्यकारी अभियंता हनवते उपविभाग सोनपेठ यांनी सर्व वीज ग्राहकांचे प्रथम स्वागत करून.लाँकडाउन कालावधीतील वीज देयके व जून 2020 मध्ये झालेली प्रचंड वाढ संदर्भात विस्तृतपणे मार्गदर्शन केले तसेच सोनपेठ उपविभागीय कार्यकारी अभियंता यांनी जुन 2020 विज देयक उदाहरणार्थ समजून सांगितले त्यानंतर वीज ग्राहकांच्या विवीध संदर्भातील तक्रारीचे उच्चस्तर लिपिक पि.पि.लांडगे यांनी निरसन केले त्यामध्ये ग्राहकांच्या वतीने साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी यांनी वीज ग्राहकांना अनेक तांड्यावर व गावोगावी चालू असलेल्या आकड्याकडे लक्ष देऊन कारवाई करावी ग्राहकांना आवरेज बिलाच्या नावाखाली या आकडे बहादर लोकांची वीजचोरी ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे का ? तसेच वीज बिल भरणा केंद्र आणि फ्युज कॉल ऑफिस सोनपेठ शहरात सुरू करण्याची मागणी केली यावर लवकरच कारवाई करतील असे आश्वासीत केले. तसेच या कोरोनाच्या महामारीत महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे ग्राहकांच्या वतीने साप्ताहिक सोनपेठ दर्शन संपादक किरण स्वामी यांनी सर्वांचे अभिनंदन केले या मीटिंगसाठी 26 अधिकारी कर्मचारी तसेच ग्राहकांनी प्रतिसाद दिला शेवटी कार्यकारी अभियंता विभागीय कार्यालय दोन परभणी यांनी ग्राहकांना महावितरण तर्फे पुरवण्यात येणाऱ्या सुविधा मोबाईल विविध अँप यांची माहिती घेऊन जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईन विज बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले समारोप प्रसंगी आभार हनवते उपकार्यकारी अभियंता यांनी मानुण सर्व वीज ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरन केल्या जाईल तरी सर्वांनी वीज देयके नियमित वेळेवर भरणा करण्याचे आवाहन केले.


No comments:
Post a Comment