रॅपिड अँटीजेन टेस्ट किट दोष विरहीत ; जिल्हा शल्य चिकित्सकांचा खुलासा
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
रॅपिड अँटिजेन टेस्टच्या किटमध्ये तांत्रिक दोष आढळल्याने परभणी जिल्ह्यातील चाचण्या तात्काळ थांबविण्याचे आदेश काढण्यात आले असल्याच्या आशयाचे वृत्त दै. पुढारी या वृत्तपत्रामध्ये सोमवार दि.27 जुलै 2020 रोजीच्या अंकात प्रसिध्द करण्यात आले होते. तरी जिल्ह्यातील रुग्णालयात उपलब्ध असलेल्या कोरोना तपासणीच्या किट चाचणीसाठी संपुर्णत: सक्षम असून त्यामध्ये कोणतेही तांत्रिक दोष नाहीत. असा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.एस.नागरगोजे यांनी केला आहे.
सोमवार दि.27 जुलै रोजी दै.पुढारीमध्ये प्रसिध्द करण्यात आलेली बातमी चुकीची असून जिल्हा रुग्णालयाकडून चाचण्या थांबविण्याचे किंवा किटमध्ये तांत्रिक बिघाड असल्याबाबतचे कोणतेही आदेश अथवा पत्र काढण्यात आलेले नाही. अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जावून परिणामी संभ्रम निर्माण झाल्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनास अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा अफवांवर जिल्ह्यातील नागरिकांनी विश्वासू ठेवू नये. असेही जिल्हा शल्य चिकित्सक, परभणी यांनी कळविले आहे.


No comments:
Post a Comment