Thursday, July 2, 2020

परभणी जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

परभणी जिल्ह्यात तीन दिवस संचारबंदी
जिल्हा प्रशासनाचा निर्णय 

परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने गुरूवारी(दि.2) रात्री 12 वाजल्यापासून ते रविवारी(दि.5) रात्री 12 वाजल्यापर्यंत ही संचारबंदी लागू राहणार आहे. महापालिका क्षेत्रात 5 किमी तर नगरपालिका क्षेत्रात 3 किमी परिसरात हे आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आदेशात नमुद केले आहे. 
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. या काळात सर्व शासकीय कार्यालय व त्यांची वाहने, शासकीय व खासगी दवाखाने, वैद्यकीय दुकान, वैद्यकीय कर्मचारी व आपत्तकालीन सेवा, शासकीय निवारागृह व अन्न वाटप करणारे एनजीओं व त्यांची वाहने, अत्यावश्यक सेवेसाठी परवाना घेतलेली वाहने व व्यक्ती, प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक्स मिडिया यांचे संपादक, प्रतिनिधी, वितरक, पेट्रोलपंप व गॅस वितरक, कर्मचारी व वाहने, खत, कृषी, बि-बियाणे वाहतुक व गोदामे, दुकाने, कामगार, कापूस खरेदी केंद्र, राष्ट्रीय बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चालनद्वारे रोकड़ भरणा तसेच ग्रामीण भागातील बँकेसाठी रोकड घेवून जाणारी वाहने तसेच दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 या वेळात या संचारबंदी काळात मुभा देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी आदेशात म्हटले आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.




No comments:

Post a Comment