Thursday, July 2, 2020

परभणी कोरोना अपडेट.... कोरोनामुक्त तिघांना डिस्चार्ज सेलूतील दोन व परभणीतील एका रुग्णाचा समावेश ; प्रयोगशाळेत एकूण 48 स्वॅब प्रलंबीत तर आता 24 रुग्ण उपचार घेत आहेत.....

परभणी कोरोना अपडेट....
कोरोनामुक्त तिघांना डिस्चार्ज सेलूतील दोन व परभणीतील एका रुग्णाचा समावेश ; प्रयोगशाळेत एकूण 48 स्वॅब प्रलंबीत तर आता 24 रुग्ण उपचार घेत आहेत.....


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातील कोरोनबाधित तिघाजणांना कोरोनामुक्त झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने गुरूवारी(दि.दोन) डिस्चार्ज दिला. सेलूतील दोन व परभणीतील एका रुग्णाचा समावेश आहे. 
जिल्हा रुग्णालयात गुरूवारी सायंकाळी पाचवाजेपर्यंत एकूण 32 संशयित रुग्ण दाखल झाले होते. वैद्यकीय अधिका-यांनी या सर्व संशयितांची तपासणी केली. पाठोपाठ नांदेड येथील प्रयोगशाळेकडे या 32 जणांसह आणखीन दोन असे एकूण 34 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी रवाना केले. त्यामुळे आता नांदेड येथील प्रयोगशाळेत एकूण 48 स्वॅब प्रलंबीत आहेत.दरम्यान, नांदेड येथील प्रयोगशाळेकडून बुधवारी मध्यरात्री प्राप्त अहवालाप्रमाणे दर्गा रस्त्यावरील गंगापूत्र कॉलनीतील दोन व झरी येथील दोन असे एकूण चार संशयितांचे स्वॅब पॉझिटीव्ह आले आहेत. हे चौघेजण  कुटुंबातील पॉझिटीव्ह आढळून आलेल्या सदस्यांच्या संपर्कात आले होते. या चार व्यक्तिरिक्त अन्य एकाचा अहवाल निगेटीव्ह आला. तर एकाचा अहवाल अनिर्णायक राखण्यात आला आहे.जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकूण 2734 संशयित दाखल झाले आहेत. 2908 जणांचा स्वॅब घेण्यात आले त्यापैकी 2638 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह स्वॅबची संख्या 122 एवढी असून अनिर्णयाक अहवालाची संख्या 88 एवढी झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी आवश्यक नसणा-या स्वॅबची संख्या 47 एवढी आहे.कोरोनबाधित रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला. तसेच 94 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यात आला. संक्रमीत कक्षात आता 24 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली. जिल्हा रूग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण 78 रुग्ण आहेत. विलगीकरण केलेले 94 जण असून विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2562 एवढया व्यक्ती आहेत.दरम्यान, आखाती देशातील मस्कद येथून एक व्यक्ती गुरूवारी परभणीत दाखल झाला. त्या व्यक्तीने शासकीय रुग्णालय गाठून वैद्यकीय तपासणी केली. त्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आली नाहीत, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



                     

No comments:

Post a Comment