Friday, July 10, 2020

ढालेगाव बंधारा भरला 96 टक्के, एक गेट उघडले 8 हजार 825 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ; मुदगल बंधार्‍यात यापूर्वीच 22 टक्के पाणी साठा उपलब्ध होता त्यात आता भर पडणार

ढालेगाव बंधारा भरला 96 टक्के, एक गेट उघडले 8 हजार 825 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ; मुदगल बंधार्‍यात यापूर्वीच 22 टक्के पाणी साठा उपलब्ध होता त्यात आता भर पडणार 


मुदगल बंधार्याची सुरक्षा रामभरोसे पाण्याची आवक सुरु कार्यालयास कुलुप कर्यचारी यांच्या संपर्क क्रमांक कार्यालयाच्या बाहेर लिहुन ठेवण्याची जनतेची मागणी 

पाथरी / सोनपेठ (दर्शन) :-

गुरूवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्याभरात दमदार पावसाने हजेरी लावली. गोदावरी नदीवर असलेल्या ढालेगाव उच्च पातळी बंधा-याच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे बंधारा 96 टक्के भरल्यामुळे शुक्रवारी(दि.10) सकाळी 11.45 मिनिटांनी बंधा-याच्या गेट क्रमांक 8 मधून 8 हजार 825 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पाथरी तालुक्यात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 54.33 मिमी पावसाने हजेरी लावली. ढालेगाव बंधारा तसेच परिसरात झालेल्या पावसामुळे बंधा-यात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी बंधारा 96 टक्के भरल्याने बंधा-यातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाथरी येथील जायकवाडी पाटबंधारे उपविभागाकडून घेण्यात आला. त्यानुसार सकाळी 11.45 मिनिटांनी या बंधा-याच्या गेट क्रमांक 8 मधून 8 हजार 825 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बंधा-यातील पाणी पातळी 85 टक्क्यावर येईपर्यंत हा विसर्ग सुरू राहणार असल्याची माहिती पाथरी येथील जायकवाडी पाटबंधारे उपविभागाचे अभियंता दिवाकर खारकर यांनी दिली.दरम्यान, हे सर्व पाणी पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण बंधार्‍याचे काम निर्माणाधीन असल्याने मुदगल बंधार्‍यात अडवले जाणार आहे. मुदगल बंधार्‍यात यापूर्वीच 22 टक्के पाणी साठा उपलब्ध होता त्यात आता भर पडणार आहे. ढालेगाव बंधारा तुडुंब भरल्याने पाथरी शहरासह तालुक्यातील व माजलगाव तालुक्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्‍न मिटणार आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



No comments:

Post a Comment