परभणी जिल्हा परीषदेस 15 व्या वित्त आयोगातून 29 कोटी 92 लाखाचा निधी -श्रीमती निर्मलाताई उत्तमराव गवळी-विटेकर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतींना एकूण 29 कोटी 92 लाख 93 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमराव गवळी-विटेकर यांनी दिली.या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना म्हणजे जिल्हा परिषदेस 10 टक्के म्हणजे 2 कोटी 99 लाख 29 हजार रुपये, पंचायत समितीस 10 टक्के म्हणजे 2 कोटी 99 लाख 29 हजार व ग्रामपंचायतीस 80 टक्के म्हणजे 23 कोटी 94 लाख 35 हजार असा एकूण 100 टक्के 29 कोटी 92 लाख 93 हजार रुपयाचा निधी अनुदान स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे.यातून ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुलभुत गोष्टींकरिता अनुदान उपलब्ध झाला आहे. सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींनी ईसीएस व एनईएफटी किंवा आरटीजीएस या आधुनिक बँकींग सिस्टीम असलेल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या खात्यावर तो निधी वर्ग होणार आहे.तेव्हा सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायीतींनी बचतखाती राष्ट्रीयकृत बँकेत तात्काळ उघडावी,असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलाताई उत्तमराव गवळी-विटेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.



No comments:
Post a Comment