जिजामाता पब्लिक स्कूल व विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती साजरी
सोनपेठ (दर्शन) :-
माजी मुख्यमंत्री, महानायक, हरित क्रांतीचे प्रणेते, श्री.वसंतराव नाईक यांच्यामुळे हरितक्रांती झाली. त्यांच्या कार्यामुळे आज राज्यात धान्याची कोठारे भरलेली आहेत.त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्पादन वाढविण्यास सदैव प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने क्रांती घडविली असेही म्हणता येईल. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त "कृषी दिन" साजरा केला जातो. असे मत जिजामाता पब्लिक स्कूल चे अध्यक्ष श्री मा. प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे साहेब यांनी व्यक्त केलं.तसेच प्रतिमेचे पूजन मा.श्री प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे साहेब प्राचार्य ए.जे.अजय सर उपप्राचार्य श्री.प्रा.गणेश जयपाल सर, श्री वैभव रत्नपारखे सर, श्री दिलीप कोलते सर, श्री.अशोक आळसे सर आणि श्रीमती- विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे मॅडम,श्रीमती-अश्विनी रोडे- चव्हाण मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.



No comments:
Post a Comment