Sunday, July 26, 2020

जगदगुरु वीर सिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्रावणमास तपोनुष्ठाण रंभापुरी पीठ येथे प्रारंभ

जगदगुरु वीर सिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी श्रावणमास तपोनुष्ठाण रंभापुरी पीठ येथे प्रारंभ 


रंभापुरी / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कर्नाटक राज्यातील चिकमंगलूरु जिल्ह्यातील बेलेहुन्नूर स्थित रंभापुरी पिठ येथे जगदगुरु
विरसिंहासनाधीश्वर श्री.श्री.श्री.1008 वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी व गुरु श्री. 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांचे श्रावणमास तपोनुष्ठान दिनांक 21 जुलै 2020 मंगळवार पासून प्रारंभ झाले याप्रसंगी 24 जुलै 2020 रंभापुरी पिठ पुर्वीचे जगदगुरु लिं.श्री.श्री.श्री.1008 शिवानंद शिवाचार्य महास्वामीजी यांची पुण्यतिथी उत्सव तसेच दररोज महापूजा रुद्राभिषेक "सकल मानव कल्याण" तसेच "कोरोना महामारी" दूर करण्यासाठी अखंड महिनाभर दिनचर्या चालू राहणार असून. याप्रसंगी कर्नाटक राज्यातील अनेक शिवाचार्य श्रावण मासात दररोज एक -दोन शिवाचार्य भेट व दर्शनाला येतात तसेच रंभापुरी पिठ येथे असलेले श्री विरभद्र मंदिर, श्री रेणुकाचार्य मंदिर, श्री गणपती मंदिर व श्री मारुती मंदिर येथेही पूजा-अर्चना व आरती प्रसाद होतो.असा दिनक्रम असून.जगदगुरु विरसिंहासनाधीश्वर श्री.श्री. श्री.1008 वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मते आपल्यातील अनेक विकार, लोभ, असूया व वाईट विचार इत्यादी राक्षसे "भ्रम" रूपात वावरतात तो भ्रमच आपणास ईश्वरा जवळ जाण्यापासून रोखतो.सदगुरुला महास्वामीजी म्हणतात या भ्रमाला दूर हाकलून देण्यासाठी सदगुरु च्या पायाशी शरण आलो तसेच तमाम विरशैव लिंगायत सदभक्तानी ही श्री गुरुंना शरण येऊन आपल्या मनातील "भ्रम" दूर करावा असे सुचवतात.


याप्रसंगी गुरु श्री 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर जगदगुरु यांच्या सानिध्यात श्रावणमास तपोनुष्ठानास कर्णाटक रंभापुरी पिठ येथे सुरुवात केली असली तरीही 
सोनपेठ येथिल  आद्यगुरु संजीवन समाधीस्थित श्री.नंदिकेश्वर शिवाचार्य यांचे दररोज रुद्राभिषेक महिनाभर शिष्य व शिवभक्त परिवार जसे मेहत्रे, चिमनगुंडे व स्वामी अशा पद्धतीने निरंतर ओमप्रकाश स्वामी हे करत आहेत.म्हणुन माझे शरीर जरी तिकडे असले तरी इकडे सर्व मन गुंतून पडलेले आहे असे सांगितले.

संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.


No comments:

Post a Comment