Saturday, July 11, 2020

महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत डी.सी.एच.सी. स्वरूपाचे आय.सी.यु. चे लोकार्पण विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते

महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत डी.सी.एच.सी. स्वरूपाचे आय.सी.यु. चे लोकार्पण विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते


परभणी / सोनपेठ (दर्शन):-

बोरी ग्रामीण रुग्णालयात महाराष्ट्रातील पहिल्या अद्ययावत डी.सी.एच.सी. स्वरूपाचे आय.सी.यु. चे लोकार्पण विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत पार पडले.
बोरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करून उभारण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले डी.सी.एच.सी स्वरूपाचे (डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ केअर सेंटर) नागरिकांच्या सेवेत आजपासून रुजू झाले आहे.
 नागरिकांना योग्य ती आरोग्यव्यवस्था देणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. काही दिवासांपूर्वीच बोरी येथे सर्वसुविधायुक्त असा अतिदक्षता विभाग उभा करू असा शब्द गावकऱ्यांना दिला होता. तो शब्द आज पूर्ण करून दाखवला व नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात नाही असा ग्रामपंचायत पातळीवरील अतिदक्षता विभाग उभा करून दाखवला. अशी प्रतिक्रिया यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी दिली.
या याठिकाणी हृदय रोग, अर्थांगंवायू सर्पदंश, विषबाधा, कोव्हीड यासारख्या अधिक गंभीर आजारावर उपचार करण्यात येतील. ग्रामीण रुग्णालयात आय.सी.यू सेंटर साठी लागणारे हाय फ्रिक्वेसीं ऑक्सिजन थेरेपी यंत्र उपलब्ध करून द्यावी, आय.पी.एस.एच अंतर्गत या रुग्णालयाचा समावेश करून तज्ञ डॉक्टर मंडळी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चौधरी यांनी केली.या मागणीवर आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी,तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी वैद्यकिय अधिकारी किशोर सुरवसे, गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे, वैद्यकीय अधिकारी डाॅ किरण चाडगे,संरपंच,आदी उपस्थित होते.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment