सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने साजरी करावी - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुंबई / परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
गेल्या ४ महिन्यांत आपण सर्व धर्मियांचे सण मर्यादित प्रमाणात साजरे केले, त्याचप्रमाणे येणारी बकरी ईद देखील साधेपणाने, जमल्यास प्रतिकात्मकरित्या आणि नियमांचे पालन करून साजरी करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले.
सण आणि उत्सव हे जीवनाचा आनंद वाढविण्यासाठी असतात. आज एकीकडे कोरोनाची साथ झपाट्याने वाढते आहे, ती रोखण्याचे आटोकाट प्रयत्न आपण करीत आहोत आणि आपण त्याला साथ द्यावी असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment