Saturday, July 11, 2020

वाबळेवाडी पॅटर्नच्या अंमलबजावणीस स्थगिती -जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची माहिती

वाबळेवाडी पॅटर्नच्या अंमलबजावणीस स्थगिती  -जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांची माहिती
 
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

सर्वत्र कोरोना संसर्गाच्या काळात कोरोनाशी दोन हात करतानाच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण रोखण्यासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक गुणवत्तेत वाढ करण्याकरिता येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांनी जिल्ह्यात लागू केलेल्या वाबळेवाडीची पॅटर्नच्या अंमलबजावणीस आपण या स्थितीत स्थगिती दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शनिवारी(दि.11) रात्री सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.या विषयात आपण उच्चपदस्थ अधिका-यांचे मार्गदर्शन मागवणार आहोत, असेही ते म्हणाले. 
माजी मंत्री श्रीमती फौजिया खान यांनी शुक्रवारी(दि.10) जिल्हाधिका-यांना एक निवेदन सादर केले होते. त्याद्वारे  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांचे या स्वयंअध्ययन अभ्यास उपक्रम राबविण्याच्या निश्‍चयाचे कौतुक केले. ही नाविण्यपुर्ण योजना या जिल्ह्यात राबविण्याचा उपक्रम निश्‍चीतच अभिनंदनीय आहे, असे नमुद केले. परंतू जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती पाहता ही नाविण्यपुर्ण योजना जिल्ह्यात राबविण्याची ही योग्य वेळ नाही. ही केंद्र सरकारच्या 6 जुलैच्या पत्रानुसार देशातील सर्व शैक्षणीक प्रतिष्ठाने 31 जुलै पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मुद्दांचा विचार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्यातील बहुतांश शाळा कोवीड सेंटर आहेत. सर्व शिक्षक शहरी भागातील ये-जा करतात. त्यांना कुठलेही सुरक्षा कवच नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे एकत्र येणे आरोग्यास ठरू शकेल. वाबळेवाडी पॅटर्न निश्‍चीतच गुणवत्ता वाढीसाठी निश्‍चतच आदर्श आहे. परंतू अंमलबजावणीची योग्य वेळ नाही. ही योजना स्थिती पाहून राबवावी असे नमुद केेले. दरम्यान, श्रीमती खान यांच्या प्रमाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष व्ही.पी.फुलतांबकर यांनीही 8 जुलै रोजी जिल्हाधिका-यांना पत्र सादर करीत या योजनेच्या अंमलबजावणीवर या स्थितीतील अंमलबजावणीवर आक्षेप घेतला होता.

No comments:

Post a Comment