दिंद्रुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा शेतकऱ्याच्या हस्ते शुभारंभ
दिंद्रुड / सोनपेठ (दर्शन) :-
भूमिपुत्र ओमप्रकाश शेटे साहेबांच्या प्रयत्नाने व माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे 2 कोटी 35 लाख रुपये किमतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र दिंद्रुड येथे मंजूर झाले आहे. त्याच्या प्रत्यक्ष बांधकामाचा शुभारंभ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या हस्ते सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून अतिशय साधेपणाने करण्यात आला. सदरील प्रा.आ.केंद्रामुळे परिसरातील असंख्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी वैजनाथ कटारे, बालासाहेब ठोंबरे, मधुकर कटारे, उस्मानखा पठाण, प्रदीप ठोंबरे, नागेश ठोंबरे, मारोती दुनगु, संतोष मुंडे, नागेश कानडे, अमीरखा पठाण, पांडुतात्या सोळंके, महाराष्ट्र केसरी शिवाजीराव केकान, अर्जुनराव वनवे, भगवानराव कांदे, विलास शेंडगे, भागवत साबळे,बाबुराव खंडागळे आदी पंचक्रोशीतील प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment