खरीप हंगामातील पिकांसाठी मार्गदर्शक सल्ला
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
पिकावरील किड रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्पातंर्गत जिल्ह्यात तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकारी –कर्मचाऱ्यांनी खरीप हंगामातील कापुस, सोयाबिन व खरीप ज्वारी या मुख्य पिकांच्या केलेल्या सर्वेक्षणानूसार कृषी विद्यापीठामार्फत पुढीलप्रमाणे पिक संरक्षण करण्याबाबत सल्ला देण्यात आलेला आहे.
कापसावर होणाऱ्या किडीच्या प्रादुर्भावावर सतत लक्ष ठेवावे व 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. सोयाबिन पिकातील खोडमाशी व चक्रीभुंगा प्रादुर्भावग्रस्त पाने व झाडे काढून आतील अळीसहीत नष्ट करावेत. तंबाखुवरील पाने खाणाऱ्या अळ्याच्या सर्वेक्षणासाठी 5 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत. तसेच 8 ते 10 पक्षीथांबे प्रति एकरी लावावेत तसेच 5 टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी. तर खरीप ज्वारीवर नवीन लष्करी अळीची अंडीपुजी तसेच लहान अळ्या आढळल्यास नष्ट कराव्यात यात 5 कामगंध सापळे प्रती एकरी नवीन लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी लावावेत व 10 पक्षीथांबे प्रती एकरी लावावेत. 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टीन 1500 पीपीएम 25 मिली 10 लिटर पाण्यातून फवारणी करावे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.


No comments:
Post a Comment