Sunday, July 19, 2020

कॉ. राजन क्षीरसागर यांना पितृशोक - भावपुर्ण श्रदांजली

कॉ. राजन क्षीरसागर यांना पितृशोक - भावपुर्ण श्रदांजली


परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

बक्षी हिप्परगा येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र सदाशिव माळी यांचे कोरोनामुळे आज सोमवारी (दि .20) पहाटे दुःखद निधन झाले. कामगार नेते राजन क्षीरसागर यांचे ते वडील होत. मृत्युसमयी त्यांचे वय 80 होते.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा येथील रामचंद्र सदाशिव माळी यांना दिनांक 7 जुलै रोजी अशक्तपणा वाटत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. दिनांक नऊ जुलैला त्यांचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर ते सोलापूर येथे उपचारार्थ दाखल होते. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. आज पहाटे साडेपाच वाजता त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा-सून विवाहित मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे.साप्ताहीक सोनपेठ दर्शन परीवार क्षीरसागर कुटूंबियांना झालेल्या दुःखात सहभागी आहे.

No comments:

Post a Comment