अंगणवाडी सेविकांना सोनपेठ नगर पालिकेने विशेष मानधन द्यावे- ऍड.सिद्धांत सिरसाट
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ शहरात कोरोणा संसर्ग काळात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणाऱ्या शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सोनपेठ नगर पालिकेने प्रोत्साहन पर विशेष मानधन द्यावे.सोनपेठ शहर हे कोरोनाच्या गर्द छायेतून जात आहे, प्रशासकीय पातळीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यात येत आहेत, तथापि स्वतःच्या जीवाची पर्वा ना करता तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन प्रत्येक घरी जाऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस आरोग्य तपासणी करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना मास्क आणि सनिटायझर सुद्धा भेटते की नाही याची खात्री देता येत नाही. याच धर्तीवर शेवटच्या घटकापर्यंत जाऊन कार्य करणाऱ्या शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रोत्साहन पर मानधन दिले जावे. यासाठी नगर पालिकेने विशेष निधीची तरतूद करावी.अशी मागणी ऍड. सिद्धांत सिरसाट दिवाणी व फौजदारी न्यायालय, सोनपेठ यांनी केली आहे.


No comments:
Post a Comment