Tuesday, July 7, 2020

माजलगावमधील प्रकाश सोळंके - मोहन जगताप छुप्या युतीवर शिक्कामोर्तब ; नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्याच उपाध्यक्षांना

माजलगावमधील प्रकाश सोळंके - मोहन जगताप छुप्या युतीवर शिक्कामोर्तब ; नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्याच उपाध्यक्षांना 



माजलगाव / सोनपेठ (दर्शन):- 

भ्रष्टाचारामुळे चर्चेत असलेल्या पालिकेतील घडामोडी दररोज नवनवीन वळण घेत आहेत. रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाचा मान भाजपच्याच उपाध्यक्षांना मिळाला. पण, त्याचा आनंद राष्ट्रवादीला अधिक झाला. त्यात मोहन जगताप वगळता भाजपचे कोणीच हजर राहीले नाही. उलट जगतापांसह खुद्द राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके लावाजम्यासह येत त्यांनी नुतन नगराध्यक्षा सुमन मुंडे यांचा सत्कार केला.
मागील सहा महिन्यापासून कोट्यावधीच्या भ्रष्टाचारामुळे माजलगाव नगर पालिका राज्यभर चर्चेत आहे. नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या अटकेनंतर रोजच नवनवीन घडामोडी घडत आहेत. प्रकाश सोळंके यांनी हाती घेतलेल्या मोहीमेला काहीसे यश येत पालिका बरखास्त झाली नाही मात्र सहाल चाऊस यांचे पद मात्र गेले. आजच्या या घडामोडीत त्यांची मोहन जगतापांसोबतची छुपी युतीही समोर आली.तसे, यापूर्वी सहाल चाऊस यांच्यावरील अविश्वासातूनही ही युती अधोरेखित झालीच होती. दरम्यान, अविश्वास ठरावाची विशेष सभा जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली. पण, नगराध्यक्षांचे पद रिक्त केले. यामुळे संविधानिक पद्धतीने भाजपच्या उपनगराध्याक्षा सुमन मुंडे यांच्याकडे पदभार आला. त्यांच्या सत्कारासाठी भाजपचे नेते आले नसले तरी, आमदार सोळंके मात्र राष्ट्रवादीच्या लवाजम्यासह उपस्थित राहिले. यावेळी राजकीय विरोधक मोहन जगतापही त्यांच्यासोबत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.यामुळे पालिकेतील घडामोडीमागे जगताप, सोळंकेंच्या छुप्या युतीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या अध्यक्षांच्या सत्काराला आमदार सोळंकेंनी केलेली घाई पालिकेतील घडलेल्या अनेक घडामोडीचे संकेत देत आहे.पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी केलेल्या ज्या समितीमुळे नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले त्याच समितीच्या अहवालात सर्वच पदाधिकारी जबाबदार असल्याचे नमूद आहे. मग सुरवातीला पालिका बरखास्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करून नगराध्यक्षांचे पद रिक्त करत उपनगराध्याक्षांकडे पदभार सोपवण्यात समाधान का मानले यामागचे कोडे मात्र नागरिकांना उलघडत नाही. नगराध्यक्ष सहाल चाऊस यांच्या मनमानी कारभाराला राष्ट्रवादीसह अनेक नगरसेवक वैतागले होते. त्याच्या अटकेनंतर आमदार सोळंकेंनी केलेली बरखास्तीची मागणी, नगराध्यक्षांवर आणलेला अविश्वास ठराव यामुळे नवीन अध्यक्ष येण्याची आशा लागली होती; परंतु भाजपच्या उपनगराध्याक्षांकडे पदभार सोपवून सत्काराला लावलेल्या हजेरीमुळे राष्ट्रवादीसह अनेक नगरसेवकात नाराजीचा सूर उमटला आहे. राजकीय विरोधक मोहन जगतापही त्यांच्यासोबत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यामुळे पालिकेतील घडामोडीमागे जगताप, सोळंकेंच्या छुप्या युतीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे.भाजपच्या अध्यक्षांच्या सत्काराला आमदार सोळंकेंनी केलेली घाई पालिकेतील घडलेल्या अनेक घडामोडीचे संकेत देत आहे.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



No comments:

Post a Comment