Wednesday, July 15, 2020

परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक उद्या जिल्ह्याच्या दौ-यावर

परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक उद्या जिल्ह्याच्या दौ-यावर



परभणी / सोनपेठ (दर्शन):-

जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे गुरूवारी(दि.16) जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार आहेत. मुंबई येथून त्यांचे गुरूवारी सायंकाळी साडेचार वाजता परभणीत सावली विश्रामगृहावर आगमन होईल. 5 वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी व तालुका अध्यक्षांसमवेत चर्चा करणार आहेत. सायंकाळी 6 वाजता मित्र पक्षांच्या जिल्हाध्यक्षां बरोबर चर्चा करणार आहेत. सायंकाळी 7 वाजता सत्ताधारी पक्षाचे खासदार व आमदार यांच्यासमवेत चर्चा करणार आहेत.शुक्रवारी (दि.17) सकाळी 8 वाजता ते शासकीय यंत्रणेसमवेत कोव्हिड-19 बाबत चर्चा करीत आढावा घेणार आहेत. सकाळी 9.15 वाजता कृषी विभागाचा आढावा घेणार आहेत. दुपारी 12 वाजता आयोजित सीआयआय डब्ल्यूआर डिजिटल कॉन्फरन्सला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 1.30 वाजता परभणी येथून अहमदनगर मार्गे मोटारीने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.



No comments:

Post a Comment