परभणी पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय यांचे नागरिकांना आवाहन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या (कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणारे) मेसेज कडे दुर्लक्ष करावे त्याचा प्रचार व प्रसार करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कृष्णकान्त उपाध्याय यांनी केले आहे.
जिल्ह्यात विविध धर्माचे, पंथाचे लोक राहतात, त्यांच्या मध्ये सामंजस्य असावे, त्यांचा अन्य समाज बांधवाशी सलोखा राहावा, बंधुत्वाची भावना प्रजवलीत राहावी.शांतता असेल तरच कायदा सुव्यवस्था बिघडत नसते.
यासाठी परभणीच्या नागरिकांना हे आवाहन करण्यात आले आहे.परभणी पोलीस सायबर सेल सोशल मीडियावर लक्ष ठेऊन आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतील असे अनावश्यक साहित्य नागरिकांनी प्रसारित करू नये असे करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.संचारबंदी दरम्यान पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.पोलीस दलाशी संपर्क साधण्यासाठी खालील नंबर्स उपलब्ध करण्यात आले आहेत. 100, 02452-226244, 7745852222, 9356709037, 9356713316, 9356720211.



No comments:
Post a Comment