सोनपेठ तालुक्यात घन वन वृक्षलागवड मोहिमेचा शुभारंभ ; अयुर्वेधीक झाडे,औषधी वनस्पती वृक्षलागवड केली तरच पर्यावरण टिकेल - गटविकास अधिकारी सचिन खुडे
सोनपेठ (दर्शन) :-
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज असुन पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने नव्याने घनवन वृक्षलागवड मोहीम ग्रामपंचायत, शाळा व प्रथमिक अरोग्य केंद्रात या स्तरावर राबविण्यात येत असल्याचे मत पंंचायत समीतीचे गटविकास अधिकरी सचिन खुडे यांनी तालुक्यातील लासीना येथे दि. 10 जुलै 2020 शनिवार रोजी घनवन वृक्षलागवड उद्घाटन प्रंसगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सौमीत्रा शामसुंदर परांडे ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे पंंचायत समीतीचे गटविकास अधिकरी सचिन खुडे पं.स.विस्तार अधिकरी, उपसरपंच प्रेमीलाबाई परांडे, चेअरमन शाम बाबा परांडे माजी चेअरमन शामसुंदर परांडे, ग्रामसेवक लक्ष्मण पितळे, जि.प.प्रा.शाळांचे मुख्याध्यापक, परिचारिका एच.एम.शेख,अरोग्यसेवक गजानन राठोड, एस.आर.जाधव आदी उपस्थित होते.पुढे बोलताना खुडे म्हणाले की,वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे.यामुळे माननीय विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्देशानुसार वा जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने घनवन वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. वृक्षाची घनदाट झाडे निर्माण करण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक करायची आहे.यामध्ये कमी उंचीची, जास्त उंचीची व झुडपे याचा समावेश आहेत.या वृक्षलागवड मोहीमेत अयुर्वेधीक झाडे,औषधी वनस्पती यांसह वेगवेगळ्या २५ प्रजातीचे ४०० ते ४५० वृक्षलागवड केली आहे.यामुळे पर्यावरण टिकुन राहील असा शेवटी खुडे यांनी विश्वास यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष परांडे,राजेभाऊ परांडे,नवनाथ परांडे, परमेश्वर कदम, हनुमान कदम,गोपाळ परांडे, तुळशीदास शिंदे, कृष्णा परांडे आदीने परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment