महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीच्या सरचिटणीस पदी येथील युवानेत्या सौ.प्रेरणा समशेर वरपूडकर
सोनपेठ (दर्शन) :-
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकारणीच्या सरचिटणीस पदी येथील युवानेत्या सौ.प्रेरणा समशेर वरपूडकर यांची शनिवारी(दि.11) निवड जाहीर करण्यात आली. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ही प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून त्यात सरचिटणीस म्हणून सौ.प्रेरणा वरपूडकर यांची नियुक्ती केली आहे. वरपूडकर या गेल्या काही वर्षापासून या जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः या क्षेत्राच्या माध्यमातून अनेक प्रश्न लावून धरले आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघात त्या विशेष सक्रीय आहेत.शैक्षणीक व सामाजिक क्षेत्रात सुध्दा त्यांचे योगदान आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रा.डाँ.मुंजाभाऊ धोंडगे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष शुभम कदम तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसेच सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.



No comments:
Post a Comment