Saturday, July 25, 2020

देशात नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू ; ग्राहकांच्या न्यायासाठी दंडासहित शिक्षेचे प्रावधान अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका शाखेच्या वतीने नवीन कायद्याचे स्वागत

देशात नवीन ग्राहक संरक्षण कायदा लागू ; ग्राहकांच्या न्यायासाठी दंडासहित शिक्षेचे प्रावधान अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका शाखेच्या वतीने नवीन कायद्याचे स्वागत




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

ग्राहकांच्या हितासाठी देशात लागू झालेला १९८६ चा कायदा रद्द करून नवीन तरतूदीसह ग्राहक हितासाठीचा नवीन कायदा २० जुलै पासून देशात लागू झाल्याचे स्वागत अखिल भारतीय ग्राहक पंचायत परभणी तालुका शाखेने केले आहे . ग्राहक हक्काचे संरक्षण होऊन त्यांची फसवणूक रोखण्यासाठी देशात १ ९ ८६ साली ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला होता . मात्र ग्राहकास अनेक वेळा न्याय देताना मर्यादा येत असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या . यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष नारायणभाई शहा , राष्ट्रीय सचिव अरूण देशपांडे यांनी वेळोवेळी मागणी करून सक्षम ग्राहक हिताचा कायदा तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला . त्यानुसार संपूर्ण देशात २० जुलै २०२० पासून नवा ग्राहक संरक्षण कायदा केंद्र सरकारने लागू केला आहे . यामुळे ग्राहकांची फसवणूकीचे नवीन फंडे वापरणाऱ्यांवर कायद्याची व्याप्ती वाढली आहे . या नव्या कायद्यानुसार न्यायालयांना वाढीव अधिकार देण्यात आले असून फसवणूक करणाऱ्यास केवळ दंड अथवा नुकसान भरपाई ऐवजी तुरूंगात पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे . तसेच सदोष आणि बनावट उत्पादनकांसोबतच त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्तीसही आता जबाबदार धरण्यात येणार आहे . हा कायदा सर्व प्रकारच्या सेवा आणि वस्तू यांना लागू असणार आहे . कोठेही खरेदी केली तरी ग्राहक तो जेथे राहतो तेथील ग्राहक आयोगात तक्रार करू शकणार आहे . आता बिमा कंपनी , बिल्डर , ट्रेव्हल्स कंपनी , बँका आणि पुरवठादार कंपन्यांच्या विरोधात ही दाद मागता येणार आहे . तसेच दाव्याचा निकाल देण्यापूर्वी प्रकरण मध्यस्थिने सोडविण्याचा प्रयत्न करणे ही कायद्याची ठळक वैशिष्ट्ये आहे . या नवीन ग्राहक कायदा लागू झाल्याने ग्राहकाला लवकर न्याय मिळेल यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत अध्यक्ष प्रा . संपत झळके , अजय भोसरेकर , रविंद्र पिंगळीकर , ओंकार जोशी , दामोदर पारीक , परभणी जिल्हाध्यक्ष डॉ . विलास मोरे , धाराजी भुसारे, सो राजश्री थोरात, डॉ संदीप चव्हाण, तालुकाध्यक्ष अब्दुल रहीम , गोपाल कच्छवे , सय्यद रफीक पेडगांवकर , मुजीब खान , बाबा भोसले , लक्ष्मण पवार , रूषीकेश फुलारी , चंद्रकांत घाडगे , योगीराज वाकोडे आदींनी सदर कायद्याचे स्वागत केले आहे


 
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.






No comments:

Post a Comment