Monday, July 13, 2020

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी ; नवीन अपॉईंटमेंट घेण्याचे आवाहन - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.....

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी ; नवीन अपॉईंटमेंट घेण्याचे आवाहन - उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.....




परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

मार्च महिन्यापासून कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पुर्णत: बंद होते. जुन महिन्यापासून कार्यालयाचे कामकाज पुर्ववत सुरु करण्यात आले आहे. तरी या कालावधीत ज्या उमेदवारांनी शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी अपॉईंटमेंट घेतली आहे. त्यांनी अपॉईंटमेंट रद्द करुन पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घेवून मिळालेल्या तारखेला चाचणीसाठी कार्यालयात उपस्थित रहावे. असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी केले आहे.
जिल्ह्यात वेळोवेळी संचारबंदी लागू केली जात असल्याने जे अर्जदार कार्यालयात येवू शकले नाहीत. त्यांनी अपॉईंटमेंट रद्द करुन पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घेवून कार्यालयात चाचणीसाठी हजर राहणे आवश्यक राहील. जुनी अपॉईंटमेंट रद्द करणे व पुन्हा नवीन अपॉईंटमेंट घेणे ही प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment