श्रावण महिन्यातील धार्मिक कार्यक्रमाबाबत आवाहन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत उपाययोजना करण्यास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग प्रतिबंध कायदा 1897 लागू केला आहे.त्यामुळे सोमवार दि.20 जुलै 2020 पासून श्रावण महिना सुरु झाला असून श्रावण महिन्यामध्ये विहीत ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सध्या सुरु असलेल्या कोरोना विषाणू प्रसाराच्या अनुषंगाने कुठल्याही ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये शासनाचे आदेश येईपर्यंत कोणतेही धार्मिक स्थळ उघडण्यात येऊ नये तसेच कोठेही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याची नोंद घ्यावी. तरी आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. असे परभणी आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा तहसिलदार परभणी यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment