शिवाजीराव मव्हाळे यांची भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीणच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड...
सोनपेठ (दर्शन) :-
भारतीय जनता पार्टी ग्रामीण नूतन जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम यांनी दि.23 जुलै 2020 गुरुवार रोजी एका निवड पत्रा व्दारे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदावर निवड पत्र देऊन नविन जबाबदारी सोपवली या आदि ते जिल्हा चिटणीस पदावर काम करत होते.त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याना हि जबाबदारी देताना निवड पत्रात आपल्या कार्यकाळात परभणी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबुत होईल.जिल्ह्यातील सर्व समाज घटका पर्यंत पार्टीचे कार्य पोहचेल.आपल्या कार्यातुन भारत मातेची सेवा घडेल.आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परीषद, नगर परीषद, महानगरपालीका, विधानसभा व लोकसभा आपली पार्टी जिल्ह्यात नंबरएक वर येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असुन आपल्या या नविन निवडीचे आपले अभिनंदन व पुढिल वाटचालीस हार्दिक शुभेच्छा डाॕ.सुभाष कदम यांच्या कडुन व्यक्त करण्यात आल्या असुन हे निवड पत्र देताना नुतण भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष डाॕ.दराडे,संघटन सरचिटनीस बाबासाहेब जामगे, सरचिटनीस शंशीकांत देशपांडे, सरचिटनीस बाळासाहेब कदम यांनाही निवड पत्र देण्यात आली.शिवाजीराव मव्हाळे यांच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवडीच्या जेष्ठ नेते रमाकांत जहागीरदार, बाबासाहेब फले पाटिल, तालुका अध्यक्ष सुशिल रेवडकर, सर्व तालुका पदाधीकारी कार्यकर्ते व मित्र परीवारासह सर्व स्तरातुन अभिनंदन होताना दिसत आहे.



No comments:
Post a Comment