सोनपेठ शहरामध्ये अखिल भारतीय वीरशैव महासंघ लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी साठी नविन जागेची मागणी
सोनपेठ शहरात वीरशैव लिंगायत समाज जसे तेली, कोष्टी, जंगम व वाणी समाज बांधवांसाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी पडत असून भविष्यामध्ये सर्व समाज मिळून 200 ते 250 परिवारासाठी महाराष्ट्र शासनाकडे मा.तहसीलदार, तहसील कार्यालय सोनपेठ व मा.मुख्याधिकारी, नगर परीषद सोनपेठ नविन स्मशानभूमी साठि सर्व सोयींनी युक्त अशा जागेची मागणी करण्यात आलेली आहे. असे निवेदन दिनांक 17 जुलै 2020 रोजी सर्व समाज बांधवांच्या स्वाक्षरीने मा.नायब तहसीलदार साहेबराव घोडके व न.प.चे.पंडितराव कदम यांच्याकडे देण्यात आलेले आहे.सध्याच्या स्मशानभूमीच्या जागा जंगम व वाणी स्वतंत्र तसेच तेली व कोष्टि स्वतंत्र असून त्या अपुऱ्या व असुविधा युक्त आहेत तरी महाराष्ट्र शासनाने वीरशैव लिंगायत समाज जसे तेली, कोष्टी, जंगम व वाणी समाज बांधवांसाठी नविन स्मशानभूमीसाठी सर्व सोयींनी युक्त जागा उपलब्ध करून दिल्यास समाज बांधव ऋणी राहीतील अशी विनंती अर्ज मधून मागणी केलेली आहे या अर्जावर सर्व तेली, कोष्टि, जंगम व वाणी समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.निवेदन देताना प्रतिनीधी स्वरुपात अखिल भारतीय विरशैव महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष सुभाषअप्पा नित्रुडकर, तालुका अध्यक्ष विनोद चिमनगुंडे, संदिप लष्करे, नगसेवक अम्रत स्वामी, प्रा.महालिंग मेहत्रे, नागनाथ कोटुळे, राजेश्वर चौडे व संपादक किरण स्वामी आदिजन सामाजीक अंतर ठेउन उपस्थित होते.


No comments:
Post a Comment