हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांना अभिवादन
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांनी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी श्री.बिबे, जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment