परभणीत कोरोना रुग्णांच्या टेस्ट मध्ये वाढ करावी जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल- राजेशदादा विटेकर
परभणी जिल्हा परीषद माजी अध्यक्ष तथा कृ.उ.बा.स.सभापती राजेशदादा विटेकर यांनी दि.21 जुलै 2020 मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेशभैया टोपे यांची जालना येथे भेट घेतली.कोव्हिड साथीच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील आरोग्य संदर्भातील विविध प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा केली. परभणी जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता घेण्यात येत असलेल्या कोरोना रुग्णांच्या टेस्ट मध्ये वाढ करावी जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल अशी विनंती केली. त्याचबरोबर या महामारीच्या काळात राज्यपातळीवर आरोग्यमंत्री म्हणून ना.राजेशभैया फिल्डवर उतरून जे काम ते करत आहेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन हि केले.


No comments:
Post a Comment