श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे यश मुलींनी मारली बाजी ; विज्ञान 92 %, कला 75 % व एम.सी.व्ही.सी.65 %
कु.कदम शिवानी सत्यवान (एम सी व्ही सी शाखेतून प्रथम)
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालय सोनपेठ येथील बारावी विज्ञान शाखेचा निकाल 92 % तर कला शाखेचा निकाल 75 % व एम.सी.व्ही.सी.चा 65 % निकाल लागला असून यशाची परंपरा कायम राखली.यात मुलींनी बाजी मारली आहे.
श्री महालिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक- कु.प्रगती माणिकराव शिंदे, दुसरा क्रमांक -कु.कांबळे जयश्री हरिभाऊ,तिसरा क्रमांक -चि.राठोड मोहन सिताराम तर कला शाखेत प्रथम क्रमांक -कु. गिरगुणे प्रियंका बालासाहेब,दुसरा क्रमांक -कु. रत्नपारखे प्रियंका मच्छीद्रनाथ,तिसरा क्रमांक -कु भताने वैष्णवी मनोहर.या विद्यार्थ्यांनी पटकावला.एम सी व्ही सी शाखेतून प्रथम क्रमांक कु -कदम शिवानी सत्यवान (60%) दुसरा क्रमांक -कु भोसले प्रियंका सुंदरराव (57%) तिसरा क्रमांक -कु घोडके वर्षाराणी.
कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान,कला व एम सी व्ही सी.शाखेतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री गुरु १०८ चन्नबसव शिवाचार्य महाराज, सचिव सुभाषअप्पा नित्रुडकर ,प्राचार्य पंढरीनाथ जोशी व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी सा.सोनपेठ दर्शन परीवार तसेच मित्र परीवार यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.








No comments:
Post a Comment