Sunday, July 19, 2020

औरंगाबादचा काला दरवाजा

औरंगाबादचा काला दरवाजा




औरंगाबाद / परभणी  / सोनपेठ (दर्शन) :-
 
औरंगाबाद 52 दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. ऐतिहासिक साक्ष देणारे हे दरवाजे अर्थात गेट आजही आपल्या भव्यतेची व सांस्कृतिक वारसाची साक्ष देत उभे आहेत.
इतिहास सांगतो की तत्कालीन मुघल शासक औरंगजेबने शत्रूपासून संरक्षणासाठी शहरात विविध ठिकाणी असे तटबंदी दरवाजे उभे केले होते. सर्व दरवाजे चिरेबंदी असून विस्तीर्ण स्वरूपात बांधण्यात आलेले आहेत. 
प्रत्येक दरवाजाला एक स्वतंत्र असा इतिहास आहे. जसे मकाई गेट म्हणजे मक्का येथे जाणारा मार्ग त्यावर बांधलेला तो सीमा दरवाजा. तर दिल्लीगेट म्हणजे दिल्लीकडे जाणारा मार्ग.
आमखास मैदानाहून कलेक्टर ऑफिसकडे जाणाऱ्या रस्त्यावर लहान मोठे असे 5 दरवाजे आहेत. त्यापैकी किले अर्क परिसरात येणारा काला दरवाजा प्रमुख आहे. 
अर्क हा शब्द तुर्की भाषेचा असून त्याचा अर्थ वस्ती असा होतो. इथून जवळच म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या बाजूला असलेल्या शाही मस्जिद परिसरात औरंगजेबचे निवासस्थान होते. शिवाय प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचे निवासस्थाने देखील याच भागात होती. त्यामुळे या भागाचे नाव किलेअर्क असे देण्यात आले. तिथून जवळच हा काला दरवाजा आहे. 
बादशाहच्या निवास्थानापासून जवळ असल्याने संरक्षणाच्या दृष्टीने काला दरवाजा महत्त्वाचा मानला जातो. या गेटसाठी काळ्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. म्हणतात हा काळा दगड अहमदनगरच्या कुठल्यातरी भागातून आणलेला होता. या काळ्या दगडात शहरातील अनेक इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. शिवाय मजिदी देखील आहेत. त्यामुळे अशा इमारतींना दगडाच्या गुणधर्मानुसार नाव पडलेली आहेत. त्यापैकीच एक काला दरवाजा. 
या दरवाजाच्या मागे शहरातील एक काली मस्जिद आहे. इतिहास अभ्यासक दुलारी कुरेशी यांच्या मते या दोन मजली दरवाजावर तोफांसाठी जागा औरंगजेबने 1659 मध्ये तटबंदी बांधण्याचे आदेश दिले. त्यानंतर 1962च्या सुमारास काला दरवाजा बांधण्यात आला. किलेअर्कची पूर्वेकडील तटबंदी सरळ रेषेत काला दरवाजाच्या बुरुजास मिळते. 
या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी भक्कम बुरूज आहेत. साधारणपणे ते अष्टकोणी असून त्यावर तोफा फिरवण्यासाठी जागा होती. बुरुजांच्या वर ठोकळयांच्या स्वरूपातील तटबंदी आहे. त्यावरून शत्रूवर हल्ला करणे सोपे जायचे. 
बुरुजांच्या दोन्ही बाजूने तीन कमानी आहेत. महापालिकेने केलेल्या सौंदर्य कामात या कमानी पांढऱ्या रंगाने रंगवण्यात आलेले आहेत. शिवाय महापालिकेने मधला रस्ता बंद करत हे दरवाजे संरक्षित केले आहेत.
मुख्य दरवाजावर फुलाची रचना दिसावी असे चारी कोपर्याला उंच मिनार आहेत. दरवाजाच्या आतून वर जाण्यासाठी 30 पायऱ्या आहेत. बुरुजांच्या दोन्ही बाजूने किल्लेदार, पहारेकरी यांना राहण्याची सोय होती.
एक अन्याय इतिहास अभ्यासक डॉ. खिजर मिर्झा यांच्या मते किलेअर्कच्या तटबंदीत काला, रंगीन आणि नौबत दरवाजे प्रमुख होते. तर, किलेअर्क, नवखंडा पॅलेस, बायजीपुरा महाल आणि बेगमपुरा महालाची तटबंदी होती. काला दरवाजा मात्र सदैव संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होता.


  
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.


No comments:

Post a Comment