सुमारे 75 वर्षाची परंपरा यंदा प्रथमच खंडीत ; कोरोनामुळे हरंगूळची राजा भर्तृहरीनाथांची प्रसिध्द यात्रा रद्द....
परभणी तालुक्यातील हरंगूळ येथे श्रावण महिन्यात होणारी श्री राजा भर्तृहरीनाथ यांची आज दि.25 जुलै 2020 शनिवार रोजी नागपंचमीच्या दिवशी आयोजित केली जाणारी यात्रा भरलीच नाही.कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.
मागील जवळपास 70 ते 75 वर्षापासून हरंगूळला दरवर्षी श्रावणामासात ही या भरविण्याची परंपरा आहे, मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे आज यात्रा भरली नाही. दरवर्षी या यात्रेसाठी हजारो भाविक येतात. एक जागृत देवस्थान म्हणूनही हरंगूळची भाविकांत ओळख आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात महिला भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी यात्रेनिमित्त त्याठिकाणी समाजप्रबोधनाचे उपक्रमही राबविले जातात. यंदा भरणारी यात्रा कोरोनाच्या संकटात रद्द करण्याचा निर्णय गंगाखेड तालुका प्रशासन व हरंगूळ ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे.
दरम्यान, सदर यात्रेसाठी कोणीही येवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून हरंगूळ गावाकडे जाणार्या सर्व रस्त्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला असून गावात कुठलीही व्यक्ती अथवा वाहन प्रवेश करणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.



No comments:
Post a Comment