सेलू,जिंतूर, पाथरी,मानवत व सोनपेठ या पाच तालुक्यातील एकूण 561 वाहन / व्यक्तींवर 1,24,200 रु चा दंड वसूल...
सोनपेठ (दर्शन) :-
महसूल, पोलीस व नगर पालिका प्रशासनाच्या वतीने सेलू,जिंतूर, पाथरी,मानवत तालुक्यासह सोनपेठ यापाच तालुक्यातील सोनपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महसुल, नगर परीषद व पोलिस प्रशासनाची संयुक्तरीत्या संचारबंदीची वाहन तपासनी पथकातील संचारबंदीच्या काळात विना मास्क फिरणे, डबल / ट्रिपल सीट मोटरसायकल वर फिरणे, विनाकारण रस्त्यावर फिरणे, प्रतिबंधित क्षेत्रात आस्थापना सुरू असणे यांवर संयुक्त मोहीम राबवून कारवाई करण्यात आली, यात पाचही तालुक्यातील एकूण 561 वाहन / व्यक्तींवर 1,24,200 रु चा दंड वसूल करण्यात आला व प्रतिबंधित क्षेत्रात सुरू असलेल्या 5 दुकानांवर कारवाई करण्यात आली तसेच एकूण 4 गुन्हेही दाखल करण्यात आले. या कारवाई वेळी 5 तालुक्यातील तहसीलदार, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी व त्यांचे कर्मचारी हजर होते.सोनपेठ येथे त्यामधे ना.तहसीलदार साहेबराव घोडके, पिंपळे, वाणी, राठोड सह, ए.पि.आ.सोमवंशी, पि.एस.आय. जाधव, गोपनीय शाखा निलपत्रेवार व न.प सर्व कर्मचारी उपस्थित होते.सर्व नागरिकांना प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, संचारबंदीचे उल्लंघन करू नये,मास्कचा वापर करावा,आपली आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, भीती बाळगू नये व प्रशासनास सहकार्य करावे.उपविभागीय दंडाधिकारी, सेलू/पाथरी,तहसीलदार सोनपेठ व मुख्याधिकारी सोनपेठ यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली.




No comments:
Post a Comment