जय श्रीराम गोशाळा सायखेडा येथे गुरुपौर्णिमा निमित्त वृक्षारोपन
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील मौजे सायखेडा येथिल जय श्रीराम गोशाळा येथे दि.5 जुलै 2020 रोजी कै.बाजीराव देशमुख विद्यालयाचे, शेळगावचे उपक्रमशील पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र महेश जाधव यांच्या शाळेच्या मोफत रोपवाटिकेतील करंज व कडुलिंब अशी एकूण 10 वृक्षांची रोपं जय श्रीराम गोशाळा सायखेडा येथे गुरुपौर्णिमा निमित्त महेश जाधव (महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष,NEPHDO) , काका महाराज कदम गोशाळा-संस्थान सायखेडा, गोपाळ गांगर्डे (सोनपेठ तालुका अध्यक्ष NEPHDO), बालाजी वांकर यांच्या हस्ते लावण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रणव सातभाई, अनिल सुरवसे, नागेश पांडुळे आदींच्या उपस्थिती होती.
तसेच मौजे नरवाडी येथे पिवळ्या पळसाचे एक रोप लावून गुरुपौर्णिमा साजरा करत 30 वडाचे कलम निर्मिती महेश जाधव यांनी गोपाळ गांगर्डे यांना मार्गदर्शन केले.




No comments:
Post a Comment