सोनपेठ येथिल जिजामाता पब्लिक स्कूलचा निकाल 100,%अदिती वामण 97.80% गुणासह तालुक्यात सर्वप्रथम....
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ येथील जिजामाता विद्यालय व पब्लिक स्कूल दहावी बोर्ड परीक्षेत सलग चौथ्या वर्षी 100 % निकाल देऊन यशाची परंपरा अबाधित ठेवली.योग्य मार्गदर्शन शिस्तबद्ध अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या माध्यमातून आदिती बालासाहेब वामन 97.80% गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला,तर स्वप्नील सूनील बरवे 94.80% आणि आनंदी देवानंद कसपटे 94.40% अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.दहावी बोर्ड परीक्षेला एकूण 25 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 10 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेऊन भरभरून यश प्राप्त केले या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये घोडके सोमेश्वर 91.60% ,अमर खरात 91% , टक्के पूजा गावडे 90.80%, हर्षदा वडकर 90%, सचिन राठोड 90.40%, रवींद्र यादव 90%, संस्कृती बोबडे 88%, आदित्य खेडकर 87.40% . या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे सचिव प्रा.डॉ.मुंजाभाऊ धोंडगे सर मुख्याध्यापिका विद्याताई धोंडगे शाळेचे प्राचार्य अजय सर, गणेश जयतपाळ सर, अश्विनी चव्हाण मॅडम, अशोक आळसे सर, दिलीप कोलते सर, शेख सर, रंगनाथ गांगर्डे सर वैभव रत्नपारखे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मत व्यक्त करताना "सोनपेठ सारख्या ग्रामीण भागातही दर्जेदार शिक्षणासाठी शाळा सदैव प्रयत्नशील राहील" असे मत शाळेचे सचिव प्रा.डॉ. मुंजाभाऊ धोंडगे सर यांनी व्यक्त केले.
सा.सोनपेठ दर्शन परीवारा तर्फे सर्व यशस्वी विध्यार्थी व विध्यार्थीनींचे मनपुर्वक अभिनंदन


No comments:
Post a Comment