कोरोना अपडेट 20 कोरोना मुक्तांना डिस्चार्ज तर रुग्णालयातील संक्रमीत कक्षात 174 रुग्ण उपचार घेत आहेत ; नव्याने 56 संशयित दाखल
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातून 20 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने शनिवारी (दि.18) सर्व औपचारिकता पूर्ण करीत डिस्चार्ज दिला.
काद्राबाद प्लॉट भागातील, परसावत नगर, पोलिस क्वार्टर, रविराज कॉर्नर, मोमीनपुरा गांधीपार्क, कडबी मंडई, जागृती कॉलनी तसेच तालुक्यातील करडगाव, कारेगाव येथील 14 रुग्णांना तसेच जिंतूर शहरातील वरूड वेस भागातील एक, हिवरखेड्यातील एक, सेलू शहरातील पारीख कॉलनी,शास्त्री नगर व मोंढ्यातील प्रत्येकी एक व सेलू तालुक्यातील रवळगाव येथील एका रुग्णास असे एकूण 5 महिला व 15 पुरूषांना डिस्चार्ज देण्यात आला.
दरम्यान, परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवारी एकूण 8 रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यात इनायत नगरात एक, गंगाखेड शहरातील देवळे जिनिंग भागातील 2 पूर्णेत 1, मानवत शहरात 2, पाथरीत 1, जिंतूर शहरात 1 असे एकूण 8 रुग्ण आढळली आहेत.
या जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 363 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून 176 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तसेच 13 बाधित मृत्यूमुखी पडले असून रुग्णालयातील संक्रमीत कक्षात 174 रुग्ण उपचार घेत आहेत.शनिवारी एकूण 8 पॉझिटीव्ह आढळून आले. 20 जणांना डिस्चार्ज व 56 संशयित नव्याने दाखल झाले आहेत.एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे.आता पर्यंत एकूण 3815 संशयित रुग्ण दाखल झाले असून संसर्गजन्य कक्षात 203, विलगीकरण केलेले 767 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2845 एवढे रुग्ण आहेत.एकूण 4047 संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील 3469 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत तर 360 स्वॅब पॉझीटीव्ह आले आहेत.125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस आयोग्य ठरले आहेत.42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.
दरम्यान,गंगाखेड येथील 55 वर्षीय, परभणी येथील मुमताज कॉलनीतील 50 वर्षीय व्यक्तीचा शनिवारी मृत्यू झाला.जिंतूर तालुक्यातील कावी येथील 70 वर्षीय बाधिताचा नांदेडात उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


No comments:
Post a Comment