Friday, July 24, 2020

नागरी क्षेत्रापुर्तीच दोन दिवस संचारबंदी - जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचा आदेश

नागरी क्षेत्रापुर्तीच दोन दिवस संचारबंदी
- जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचा आदेश



परभणी / सोनपेठ (दर्शन) :-

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर दि.24 जुलैच्या सायंकाळी पाच वाजल्यापासून दि.26 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे दोन दिवस जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी नागरी क्षेत्रात संचारबंदी लागू केली आहे. 
परभणी महानगरपालिका हद्द व त्या लगतचा पाच किमी परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका हद्द व लगतचा 3 किमीच्या परिसरात ही संचारबंदी लागू राहणार आहे.
दरम्यान, शासकीय कार्यालय, त्यांचे कर्मचारी, वाहने, वैद्यकीय सुविधा, एनजीओं प्रतिनिधी, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्तीं, माध्यमांचे प्रतिनिधी, पेट्रोल पंप व गॅस वितरक यांच्यासह दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9, राष्ट्रीयकृत शेड्युल्ड बँका, खासगी बँका, नागरी, सहकारी बँकांना केवळ केवळ रास्तभाव दुकानदार, पेट्रोलपंप चालक, गॅस वितरक, कृषी साहित्य विक्री केंद्र यांच्याकडून चालनाद्वारे पैसे भरून घेणे.बँकेची ग्रामीण भागात रोकड पोहचविण्या करिता परवानगी बहाल करण्यात आली आहे.महा ई सेवा केंद्र,सीएससी सेंटर यांना संध्याकाळी 10  पर्यंत सुट राहिल. तसेच सलून दुकानदारांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुट राहिल,अशी माहिती जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी दिली.


  
 संपादक किरण रमेश स्वामी                सा.सोनपेठ दर्शन बातमी व                      जाहीरातीसाठि संपर्क                               मो.9823547752.



No comments:

Post a Comment