Monday, July 27, 2020

ज्याचा विरोध केला त्यांच्याच सतरंज्या उचलण्याची वेळ ; भाजपाचे जिंतूरचे कार्यकर्ते प्रदीप फाले यांची खंत व राजीनामा

ज्याचा विरोध केला त्यांच्याच सतरंज्या उचलण्याची वेळ ; भाजपाचे जिंतूरचे कार्यकर्ते प्रदीप फाले यांची खंत व राजीनामा


जिंतुर / सोनपेठ (दर्शन) :-

गेल्या 20-30 वर्षापासून ज्या मंडळींना कायम विरोध केला. त्यांच्याच सतरंज्या उचलण्याची वेळ आपल्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांवर आल्याची खंत भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी प्रदीप फाले यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविलेल्या एका निवेदनाद्वारे केली व्यक्त केली असून आपण पदांचे स्वइच्छेने राजीनामा देत आहोत, असेही नमुद केले. 
इतर पक्षातून ऐनवेळी इनकमिंग केलेल्या विविध व्यक्ती विविध पदांवर विराजमान होत आहेत. पैशाची लालुच दाखवून सर्व पदे भोगत आहेत. आपल्यासह इतर ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी गेल्या 20-30  वर्षापासून जीवचं रान केलं, सेवा केली त्या कार्यकर्त्यांना मात्र सातत्याने विविध पदांपासून कायम दुर्लंक्षीत राहवे  लागत आहे. ज्या-ज्या मंडळींनी पक्षात घुसखोरी केली ती मंडळी तातडीने पदे पटकावत असून आपणच निष्ठावन असल्याचा आव आणत आणून बसले आहेत, अशी टिका फाले यांनी या निवेदनातून केली. ज्याच्याशी कायम विरोध केला त्याच लोकांच्या सतरंज्या उचलण्याची वेळ जुन्या कार्यकर्त्यांवर आली असल्याचे नमुद करीत फाले यांनी या गलिच्छ खेळ्यापासून आपण स्वतःस कायम दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे म्हटले. 
आपण आपल्या जबाबदा-यांचा राजीनामा देत आहोत. यापुढे सामाजिक कार्यातच रस घेवू, कोणत्याही निवडणुकीत, राजकीय घडामोडीत सहभागी असणार नाही, असे स्पष्ट करीत फाले यांनी पक्ष यशाच्या शिखरावर पोहचला असतांना सामान्य कार्यकर्त्यांस न्याय मिळत नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संपादक किरण रमेश स्वामी सा.सोनपेठ दर्शन बातमी व जाहीरातीसाठि संपर्क मो.9823547752.

No comments:

Post a Comment