परभणी कोरोना अपडेट...
प्रलंबीत स्वॅबची संख्या 11 ; संक्रमीत कक्षात आता 47 रुग्णांनवर उपचार सुरु तर कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर
परभणी / सोनपेठ (दर्शन) :-
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्नालययाच्या प्रयोग शाळेकडून सोमवारी (दि.6) सकाळी अहवाला प्रमाणे परभणीतील एकूण 2, तालुक्यातील झरी येथील 2 व गंगाखेड शहर व तालुक्यातील प्रत्येकी एक व मानवत शहरातील एक असे एकूण 7 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले आहेत.त्यामुळे एकूण जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 149 एवढी झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहा वाजे पर्यंत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात नऊ संशयित दाखल झाले आहेत.वैद्यकीय अधिका-यांनी या सर्व संशयितांची तपासणी केली. पाठोपाठ नांदेड येथील प्रयोग शाळेकडे ते नऊ व अन्य असे मिळून 11 जणांचे स्वॅब पाठविण्यात आले. त्यामुळे आता नांदेड येथील प्रयोगशाळेत प्रलंबीत स्वॅबची संख्या 11 एवढी आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आतापर्यंत एकूण 2800 संशयित दाखल झाले आहेत. 3015 जणांचा स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी 2714 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. पॉझीटीव्ह स्वॅबची संख्या 149 एवढी असून अनिर्णायक अहवालाची संख्या 95 एवढी झाली आहे. आजपर्यंत तपासणीसाठी आवश्यक नसणा-या स्वॅबची संख्या 47 एवढी आहे.कोरोना बाधित रुग्णांपैकी चौघांचा मृत्यू झाला. तसेच 98 जणांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयाने डिस्चार्ज देण्यात आला. संक्रमीत कक्षात आता 47 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सा.सोनपेठ दर्शनशी बोलतांना दिली.जिल्हा रूग्णालयातील संसर्गजन्य कक्षात एकूण 65 रुग्ण आहेत. विलगीकरण केलेले 127 जण असून विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 2608 एवढया व्यक्ती आहेत.परदेशातून आलेले 73 व त्यांच्या संपर्कात आलेले 6 व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, कोरोनाबाधित सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील सूत्रांनी दिली.


No comments:
Post a Comment