माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जयंती व कृषी दिन अंतर्गत वृक्षलागवडीचा पंचायत समिती सोनपेठ येथून शुभारंभ
सोनपेठ (दर्शन ) :-
दिनांक 1 जुलै 2020 बुधवार रोजी पंचायत समिती सोनपेठ येथे वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान व हरितग्राम सामाजिक दायित्व अभियान 2020 अंतर्गत वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर, गटविकास अधिकारी श्री सचिन खुडे , कृषी अधिकारी श्री कदम, भगवान राठोड , विस्तार आधिकारी श्री माळी , श्री पाचलेगावकर, इतर अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा वृक्षभेट देऊन स्वागत करण्यात आले.पंचायत समितीच्या आवारात सन्माननीय उपस्थितांच्या हस्ते वृक्ष लागवड करून सदर वृक्षाचे पालकत्व गट विकास अधिकारी तसेच पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांनी स्वीकारले आहे.
वृक्षलागवड व संगोपन करण्याचे
"पालकत्व " स्विकारण्याच्या धर्तीवर जर सर्वांनी काम केले तर पूर्ण परभणी जिल्हा हरित होईल अशा शब्दात मा.अध्यक्षा श्रीमती. निर्मलाताई उत्तमराव विटेकर यांनी येथील कामाचे कौतुक केले.सारे जण सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करून मास्क सह कार्यक्रमाला उपस्थित होते.



No comments:
Post a Comment