गोदाकाठच्या चार गावच्या ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ; शेळगाव ते ऊक्कडगाव रस्त्यावर पाइप व मुरूम टाकून रस्ता वाहतुकी साठी सुरळीत
सोनपेठ (दर्शन) :-
सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ते ऊक्कडगाव रस्त्यावरील नाल्यात पावसामुळे पाणी साचल्याने सतत रस्ता बंद पडून चार गावच्या ग्रामस्थांची गैरसोय होत होती. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा परिषदेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे पुलाच्या कामाला मंजूरी मिळत नाही .परंतु गोदाकाठच्या ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश दादा विटेकर यांनी स्वखर्चाने सदरील रस्त्यावर पाइप व मुरूम टाकून रस्त्याचे काम दोन दिवसांत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.




No comments:
Post a Comment